बिहारमध्ये राजकीय भूकंप! प्रशांत किशोर यांची ‘जदयू’मधून हकालपट्टी

3658

बिहारची विधानसभा निवडणूक तोंडावर आली असतानाच मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुधवारी मोठा निर्णय घेतला. नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून मतभेद झाल्याने प्रशांत किशोर आणि पवन वर्मा यांची जदयूमधून हकालपट्टी करण्यात आली आहे.

नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार व जदयूचे नेते प्रशांत किशोर यांच्यात बिनसले होते. प्रशांत किशोर यांनी मंगळवारी नितीश कुमार यांना फटकारत त्यांचा खोटारडे असा उल्लेख केला आहे. त्यामुळे दोघांमध्ये तणाव वाढला होता. अखेर बुधवारी पक्षविरोधी कारवाईचा आरोप ठेवत प्रशांत किशोर आणि पवन वर्मा यांना पक्षातून बाहेर काढण्यात आले आहे.

नितीश कुमारांचा दावा अन्…

मंगळवारी प्रशांत किशोर यांच्या बाबत नितीश कुमार यांना एका कार्यक्रमात विचारले असता त्यांनी देखील नाव न घेता अप्रत्यक्षरित्या त्यांना टोले हाणले होते. यावेळी त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या सांगण्यावरून प्रशांत किशोर यांना पक्षात घेतल्याचा दावा केला. त्यांचा हा दावा खोटा असल्याचे प्रशांत किशोर यांचे म्हणणे आहे. किशोर यांनी ट्विटरवरून नितीश कुमार यांना फटकारले. यानंतर बुधवारी त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या