कसारा घाटात दरीत कोसळली कार, एक ठार, चार अत्यवस्थ

20

सामना प्रतिनिधी, कसारा

इगतपुरी येथे पर्यटनासाठी आलेल्या मालेगाव येथील कटकिया कुटुंबाची कार कसारा घाटातील एक हजार फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात एक जण ठार, तर चार जण अत्यवस्थ झाल्याची घटना घडली.

मालेगावहून कटकिया कुटुंब इगतपुरी येथे गेले होते. सायंकाळी घरी परतत असताना कसारा घाटात चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने ती खोल दरीत कोसळली. त्यामध्ये वैष्णवी कटकिया हिचा जागीच मृत्यू झाला. हरीश, रुद्रा, आदिती व गीता कटकिया हे चौघे गंभीर जखमी आहेत.अपघात एवढा भीषण होता की गाडीची केवळ नंबरप्लेटच शिल्लक राहिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या