लैंगिक अत्याचारप्रकरणी ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांच्यावर गुन्हा दाखल

23

सामना ऑनलाईन। शिमला

एकेकाळी हिंदी सिनेसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांच्यावर लैंगिक अत्याचारप्रकरणी शिमला पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जितेंद्र यांनी आपल्यावर १९७१ साली लैंगिक अत्याचार केला होता. अशी तक्रार त्यांच्या मामे बहिणीने केली आहे. तसेच जितेंद्र यांना अटक करण्याचीही मागणी तिने केली आहे.

याप्रकरणी पीडित महिलेने फेब्रुवारी महिन्यात हिमाचल प्रदेशचे पोलिस महासंचालक एस आर मार्डी यांना एक मेल पाठवला होता. यात जितेंद्र यांच्याविरोधात लौंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी तिने केली होती. तसेच ज्यावेळी तिच्यावर हा अत्याचार झाला त्यावेळी जितेंद्र यांचे नाव रवि कपूर होते असेही तिने या मेलमध्ये सांगितले होते.

पीडित महिलेने दिलेल्या माहितीच्या आधारे कलम ३५४ अंतर्गत शिमला पोलीस ठाण्यात जितेंद्र यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे शिमल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक उमापती जामवाल यांनी सांगितले आहे. पीडित महिलेचा मेल मिळाल्यानंतर तिच्याकडून लेखी स्वरूपातही तक्रार घेण्यात आली आहे. तसेच लवकरच तिचा जबाब नोंदवण्यात येणार आहे असे जामवाल यांनी स्पष्ट केले.

#METOO मुळे झाले धाडस

सध्या जगभरातील महिला #METOO कॅम्पेननुळे त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराबदद्ल उघडपणे बोलायला लागल्या आहेत. त्यातूनच आपल्याला हिंमत मिळाल्याचा दावा पीडित महिलेने केला आहे. हे प्रकरण ४७ वर्षापूर्वीचे असून त्यावेळी महिला १८ वर्षांची तर जितेंद्र २८ वर्षांचे होते.

आपली प्रतिक्रिया द्या