‘अभिनयसम्राट’ अशोक सराफ यांना जीवन गौरव !

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ म्हणजेच सर्वांचे अशोकमामा, खळखळून हसवणारे आणि तेवढेच अंतर्मुख करणारे व्यक्तिमत्त्व. पन्नासच्या वर हिंदी सिनेमा, दोनशेच्या आसपास मराठी सिनेमा, पंधरा टीव्ही मालिका, पंचवीस नाटके आणि पुरस्कारांचे अर्धशतक एवढा भव्यदिव्य प्रवास त्यांचा आहे.

अभिनयाचे विद्यापीठ समजल्या जाणाऱ्या अशोक सराफ यांना यंदाचा ‘झी मराठी चित्रगौरव 2023’चा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. चित्रगौरव सोहळ्यात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येईल. या वेळी अभिनेता सिद्धार्थ जाधव आपल्या नृत्याविष्काराने अशोकमामांचा जीवनप्रवास उलगडत त्यांना अनोखी मानवंदना देणार आहे.  चित्रगौरवच्या मंचवर सचिन आणि सुप्रिया यांचा धमाकेदार डान्स परफॉर्मन्स बघायला मिळेल. ‘झी चित्रगौरव पुरस्कार’ सोहळा 26 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रसारित होईल.