अबब..! सशाच्या मूर्तीला मिळाली 637 कोटींची विक्रमी किंमत, वाचा काय आहे खास

सामना ऑनलाईन । न्यू यॉर्क

अमेरिकेमध्ये एका सशाच्या मूर्तीला 91.1 मिनियन डॉलर अर्थात 637 कोटी रुपयांची विक्रमी किंमत मिळाली आहे. अमेरिकन कलाकार जेफ कून्स यांनी ही सशाची मूर्ती बनवली आहे.

rabbit

ही मूर्ती स्टिल या धातूपासून बनवण्यात आली असून सशाच्या हातामध्ये गाजर आहे. कोणत्याही जिवंत कलाकाराच्या कलाकृतीला मिळालेही ही सर्वाधिक किंमत आहे.

rabbit1

सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, बुधवारी लिलावादरम्यान तीन फुटांच्या कलाकृतीला बोली सुरु झाली. सुरुवातीला 5 ते 7 कोटी डॉलर एवढी किंमत मिळण्याचा अंदाज होता. परंतु अखेर बोली वाढत जाऊन 8 कोटी डॉलरच्याही वर गेली.

rabbit3

20 व्या शतकातील सर्वात प्रतिष्ठित अशा या कलाकृतीला रॉबर्ट मनूचिन या व्यक्तीने खरेदी केले आहे. या मूर्तीला चेहरा नसल्याने ती त्याला रहस्यमय बनवते आणि चंचलता उत्पन्न करते, असे एका वेबसाईटने आपल्या प्रिव्ह्यूमध्ये म्हटले आहे.

rabbit4