चीनच्या वरिष्ठ अणुशास्त्रज्ञाचा संशयास्पद मृत्यू

चीनचे वरिष्ठ अणुशास्त्रज्ञ आणि हार्बिन अभियांत्रिकी विद्यापीठाचे उपाध्यक्ष झांग झिजियान यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. एका इमारतीवरून कोसळल्यामुळे हा मृत्यू झाला आहे. झांग झिजियान यांनी चीनच्या अणू कार्यक्रमाशी संबंधित असलेल्या संस्थेचे पदाधिकारी म्हणूनही जबाबदारी स्वीकारली होती. झांग या ठिकाणी कॉलेज ऑफ न्यूक्लिअर सायन्स अॅण्ड टेक्नोलॉजीमध्ये प्राध्यापक होते.

आपली प्रतिक्रिया द्या