
बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने अवघ्या कमी वयात इंडस्ट्रीमध्ये आपली ओळख बनवली आहे. आपल्या शानदार अभिनयाबरोबर बोल़्ड लूकसाठीही जान्हवी प्रसिदध् आहे. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. बॉलीवूडमध्ये स्टारकिड हा सर्वात चर्चेचा विषय आहे. आई-वडिलांमुळे चित्रपटांमध्ये प्राधान्य दिलं जातं असं अनेकदा बोललं जातं आणि ट्रोल केलं जातं. याबाबत जान्हवीला नुकत्याच एका मुलाखतीत विचारले असता तिने बेधडक मत मांडलं आहे.
जान्हवीने या मुलाखतीत ट्रोलींगबाबत विचारलेल्या प्रश्नावर म्हणाली की, तुम्ही काहीही करा, लोकं तुमच्यात काहीतरी कमतरता काढणारच. हे पाहून खूप दु:ख होतं. कारण जेव्हा कामासाठी आपण मेहनत करतो, आपला घाम गाळतो, मानसिक त्रासातून जातो आणि लोकं अगदी सहजतेने बोलतात अभिनय येत नसेल तर अभिनय का करतात ? हे फार वाईट आहे.
इतकेच नाही तर जान्हवीने असेही सांगितले की, लोकांनी तिला नेपोटिझम मुलगी देखील म्हटले आहे. अशा गोष्टी ऐकून आपला आत्मविश्वास कमी होतो. पुढे एक अनुभव शेअर करताना जान्हवी म्हणते की, काही लोकं तुमच्याविषयी कधीच चांगला विचार करत नाहीत. उलट ते तुमच्याकडून तुमच्यातील चांगल्या गोष्टी हिसकावून घेऊ पाहतात. आपला ट्रोलिंगचा अनुभव शेअर करताना जान्हवी म्हणते की, “मी खूप आभारी आहे की मी अशा टप्प्यावर पोहोचले आहे जिथे मला हसता येईल. मला माझी ताकद आणि कमकुवतपणा माहित आहे.