10वी पास शिक्षणमंत्र्यांचे पुढचे टार्गेट 12 वी उत्तीर्ण करण्याचे, कॉलेजमध्ये घेतला प्रवेश

1225

झारखंडचे शिक्षणमंत्री जगन्नाथ महातो हे फक्त 10 वी पास आहेत. यावरून आतापर्यंत त्यांच्यावर यथेच्छ टीका करण्यात आली आहे. जो माणूस 10 वी पास आहे तो शिक्षण खात्याचा मंत्री कसा काय होऊ शकतो अशी टीका विरोधकांसह शिक्षणतज्ज्ञांनी केली होती. यामुळे जगन्नाथ महातो यांनी आता 12 वीची परीक्षा उत्तीर्ण करायचं ठरवलं असून त्यांनी एका कॉलेजात 11वीच्या वर्गात प्रवेश घेतला आहे. ज्या कॉलेजची त्यांनीच स्थापना केली होती त्या नावाडीह देवी महातो कॉलेजमध्येही जगन्नाथ महातो यांनी प्रवेश घेतला आहे.

jagannath-admission

अकरावी ऑनलाइन प्रवेश 30 ऑगस्टला; पहिली गुणवत्ता यादी

जगन्नाथ महातो यांच्यासंदर्भात ANI ने बातमी दिली आहे. “मी 11 वी साठी प्रवेश घेतला आहे. मी खूप अभ्यास करेन शिक्षणमंत्री म्हणून माझ्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ लागलं तेव्हा मला वाईट वाटलं होतं. वाईट यासाठी वाटलं होतं की मी फक्त 10वी पास आहे.” महातो यांनी म्हटलंय की त्यांच्या मंत्रालयाने झारखंडमध्ये 4416 शाळा सुरू केल्या आहेत. त्यांच्या राज्यात आधुनिक सुविधांसह उत्तम शिक्षण दिलं जाईल.

विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा; सर्वेोच्च न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली

झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रणेते बिनोद बिहारी महातो यांनी शिका आणि संघर्ष कराचा नारा दिला होता. त्यांच्या या घोषणेमुळे प्रभाविक होऊन मी 10 वी ला प्रवेश घेतला होता असं जगन्नाथ महातो यांनी सांगितले. 10वीमध्ये मला द्वितीय श्रेणी मिळालीस, मात्र त्यानंतर राजकारणात सक्रीय झाल्याने मला पुढील शिक्षण घेणं जमलं नाही असं जगन्नाथ यांनी म्हटलं आहे. आपण पुढे शिकू शकलो नाही याचं मला दु:ख वाटतं असेही ते म्हणाले आहेत. जगन्नाथ हे झारखंडच्या इतिहासातील पहिले शिक्षणमंत्री आहेत जे फक्त 10 वी पास आहेत. त्यांच्या आधीचे सगळे मंत्री किमान पदवीधर तरी होते.

आपली प्रतिक्रिया द्या