आयसीसी महिला क्रिकेट वन डे रँकिंग – मितालीची घसरण, तर झुलनची झेप

हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत 1-2 अशी हार सहन करावी लागली. या मालिकेत कर्णधार मिताली राजला अव्वल दर्जाची कामगिरी करता आली नाही. याचे पडसाद आयसीसीच्या रँकिंगवर उमटले आहेत. मिताली राजची फलंदाजांच्या रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावरून तिसऱया स्थानावर घसरण झाली आहे. गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये मात्र हिंदुस्थानची अनुभवी खेळाडू झुलन गोस्वामी हिने दुसऱया स्थानावर झेप घेतली आहे. संघांच्या रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलियाने पहिले स्थान कायम राखले असून हिंदुस्थानी महिला संघ चौथ्या स्थानावर आहे.

आयसीसी महिला वन डे रँकिंग

अव्वल पाच फलंदाज

1) लिझेली ली –   761 रेटिंग

2) एलीसा हिली       750 रेटिंग

3) मिताली राज –       738 रेटिंग

4) टॅमी ब्युमोंट – 728 रेटिंग

5) अॅमी सॅटर्थवेट       717 रेटिंग

अव्वल पाच गोलंदाज

1) जेस जॉनासेन  760 रेटिंग

2) झुलन गोस्वामी      727 रेटिंग

3) मेगन शूट       717 रेटिंग

4) मेरीझेन पॅप    715 रेटिंग

5) सोफी एक्लेस्टोन    701 रेटिंग

अव्वल पाच अष्टपैलू

1) मेरीझेन पॅप    384 रेटिंग

2) नताली सिवर 372 रेटिंग

3) एलीस पेरी     365 रेटिंग

4) स्टेफनी टेलर   322 रेटिंग

5) दीप्ती शर्मा      299 रेटिंग

अव्वल पाच देश

1) ऑस्ट्रेलिया      161 रेटिंग

2) इंग्लंड           119 रेटिंग

3) दक्षिण आफ्रिका      117 रेटिंग

4) हिंदुस्थान       113 रेटिंग

5) न्यूझीलंड        92 रेटिंग