मेवानी, खालिद यांच्या भाषणाचे ऑडिओ-व्हिडिओ तपासणार

सामना ऑनलाईन । पुणे

पुण्यात ३१ डिसेंबरच्या रविवारी शनिवारवाडा येथे झालेल्या एल्गार परिषदेत जिग्नेश मेवानी आणि उमर खालिद यांनी केलेल्या भाषणाचे ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्ड तपासून कायद्यानुसार कारवाई करू, असे अपर पोलिस आयुक्त रविंद्र सेनगावकर यांनी सांगितले.

जिग्नेश मेवानी आणि उमर खालिद यांच्या भाषणांविरोधात अक्षय बिक्कड या तरुणाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीआधारे तपास सुरू आहे, अशी माहिती सेनगावकर यांनी दिली. सर्व शक्यता तपासून तसेच हाती येणाऱ्या पुराव्यांच्या आधारे कायद्यानुसार कारवाई करू, असे अपर पोलिस आयुक्त रविंद्र सेनगावकर यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या