जिओचा एअरटेलवर खोटारडेपणाचा आरोप

48

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

सध्या हिंदुस्थानात जिओ विरूद्ध इतर मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्या असं युद्ध पहायला मिळतंय. या युद्धात इतरांनी जिओवर आजपर्यंत आरोप केले, तक्रारी केल्या. मात्र पहिल्यांदाच जिओने एअरटेलविरूद्ध तक्रार केलीय. जिओने तक्रारीत म्हटलं आहे एअरटेलने इंटरनेटचा वेग सर्वाधिक असल्याचा दावा केलाय जो सपशेल खोटा आहे.

एअरटेलने एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे, ज्यात त्यांनी म्हटलंय की ४० दशलक्ष चाचण्यांनंतर ओकलाने एअरटेलचा वेग सर्वाधिक असल्याचं म्हटलं आहे. ओकला एक अॅप्लिकेशन आहे ज्याच्या मार्फत इंटरनेटचा वेग किती आहे ते तपासता येतं

जिओने आरोप केलाय की ओकला ही कोणतीही सरकारी संस्था नाहीये ती खाजगी कंपनी आहे आणि हे सगळं एअरटेल आणि ओकलाचं संगनमत आहे. जिओचा आरोप आहे की ओकला ही कंपनी वेग जास्त आहे असं सांगण्यासाठी पैसे घेते. त्यामुळे एअरटेलच्या जाहिरातींवर निर्बंध आणावेत अशी मागणी करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या