जिओ प्राइमच्या मेंबरशिपची मुदत वाढणार

12

सामना ऑनलाईन,मुंबई

प्राइम मेंबरशिप ऑफरमध्ये रिलायन्स जिओला ग्राहकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे कंपनी मेंबरशिप घेण्याची मुदत ३० एप्रिलपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे. मेंबरशिप ऑफरमध्ये जिओला फक्त ५० टक्के ग्राहकांनीच प्रतिसाद दिल्यामुळे ही मुदत वाढवण्याची शक्यता दूरसंचार क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केली आहे.  रिलायन्स जिओची फ्री इंटरनेट आणि व्हॉइस कॉल सेवा ३१ मार्च रोजी संपणार असून १ एप्रिलपासून जिओची प्राइम मेंबरशिप सेवा सुरू होणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. यासाठी ग्राहकांना १ ते ३१ मार्चपर्यंत मेंबरशिप घ्यावी लागणार असल्याचे कंपनीने जाहीर केले होते. त्यानंतर ग्राहकांना जिओच्या टेरिफ प्लॅननुसार रिचार्ज करावे लागणार आहे. जिओची मेंबरशिप घेण्यासाठी ग्राहकांना ९९ रुपये द्यावे लागणार आहेत. ही मेंबरशिप एक वर्षासाठी असेल. त्यानुसार ३०३ रुपये प्रतिमहिना दराने ३१ मार्च २०१८ पर्यंत अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि प्रतिदिन एक जीबी डाटा वापरता येईल.

आपली प्रतिक्रिया द्या