जियोच्या ग्राहकांना झटका.. ही ऑफर केली बंद

23

सामना ऑनलाईन । मुंबई

४जी इंटरनेट आणि दिवसाला १ जीबी डेटा देत हिंदुस्थानी इंटरनेट विश्वात तुफान लोकप्रिय झालेल्या जियोने ग्राहकांना एक मोठा झटका दिला आहे. हॅप्पी न्यू इयर नावाची नवीन ऑफर देताना नाताळच्या दिवशी एक रिचार्ज ऑफर बंद करत आहे. या ऑफरमध्ये ग्राहकाला एखाद्या विशिष्ट किमतीच्या रिचार्जवर कॅशबॅक मिळण्याची सुविधा उपलब्ध होती.

या ऑफरमध्ये ३९९ आणि त्यापेक्षा जास्तीच्या रिचार्जवर ४०० ते २,५९९ रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळत होता. ही ऑफर आता बंद करण्यात येत आहे. त्याऐवजी आता जियोच्या नवीन ग्राहकांना ३९९ च्या रिचार्जवर ३०० तर जुन्या ग्राहकांना १४९च्या रिचार्जवर १४९ रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. कॅशबॅकच्या जुन्या ऑफरमध्ये हीच रक्कम अडीच हजार इतकी होती. तसंच, फ्लिपकार्ट, अॅमेझॉन, पेटीएम, फ्रीचार्ज अशा अनेक रिचार्ज अॅप्लिकेशन्समध्ये वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या जाणार आहेत. या रिचार्जसाठी JIO असं टाइप करून त्यापुढे व्हाउचरची किंमत टाकावी लागणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या