जिओ स्टुडिओज आणि सुबोध भावे यांचा बहुप्रतिक्षित संगीतमय चित्रपट ‘संगीत मानापमान’ 10 जानेवारी 2025 ला प्रदर्शित होणार आहे. सोशल मीडियावर चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले असून सुबोध भावेबरोबर सुमित राघवन आणि वैदेही परशुरामी ही त्रयी पुन्हा एकदा मोठय़ा पडद्यावर झळकणार आहे.
वैदेहीचे नऊवारीतील विलोभनीय सौंदर्य आणि मराठमोळा साज तर राजबिंडा पारंपरिक पोशाखामधला सुमित राघवनचा लुक पाहता या चित्रपटाची भव्यता झळकून येत आहे. प्रेम, वीरता, शौर्य यांची गुंफण असलेले ‘संगीत मानापमान’ नवीन वर्षात प्रेक्षकांसाठी एक मनोरंजनाची अविस्मरणीय भेट ठरणार आहे.