जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नीकडून तक्रारदाऱ महिलेविरोधात तक्रार

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा आरोप करणाऱ्या महिलेविरोधात आव्हाड यांची पत्नी ऋता आव्हाड यांनी तक्रार नोंदवली आहे. महिलेने चुकीची तक्रार करून आव्हाड यांची बदनामी केली आहे, अशी तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच आव्हाडांविरोधातील गुन्हा जर पोलीस सिद्ध करू शकले नाही तर त्यांच्याविरोधातही कोर्टात जाणार असल्याचा इशाराही ऋता आव्हाड यांनी दिला आहे.

अंगावर धडकणाऱ्या व्यक्तिला बाजूला करणे गुन्हा असेल तर बाजारात, ट्रेन मध्ये, रेल्वे पुलावर, गर्दीमध्ये रोज शेकड्यांनी ‘विनयभंग’ होत असतील. ज्या महिलेने ही तक्रार दाखल केली आहे, त्यांच्याकडे मोटीव्ह आहे. छट पुजेवरून झालेल्या बाचाबाचीत रीदा रशिद यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्या जामिनावर आहेत. NCP व आव्हाडांविरोधात आक्षेपार्ह बोलल्या आहेत, असं ट्विट देखील ऋता आव्हाड यांनी केलं आहे.