देव माझा

जितेंद्र जोशी आपल्या कामात, निसर्गात, कलेत देवाची अनुभूती घेणारा

निसर्गात देव आहे!

देव म्हणजे ? – सगळ्या धर्मातलं जे सकारात्मक आहे, ते म्हणजे देव. अन्नात, भूकेत, स्वच्छतेत देव आहे.

आवडते दैवत ? – संत गाडगेबाबा, बाबा आमटे

धार्मिक स्थळ ? –  सुवर्णमंदिर

आवडती प्रार्थना – ए मालिक तेरे बंदे हम…

आवडते देवाचं गाणं ? – एक तुही भरोसा, एक तुही सहारा…हे ईश्वर, हे अल्ला ये पुकार सुन…

धार्मिक साहित्य कोणतं वाचलंय का ? – गाडगेबाबांचं चरित्र.

दैवी चमत्कारांवर विश्वास आहे का? – अजिबात नाही.

शुभ रंग ? – काळा

एखादी अशी गोष्ट जी केल्यावर समाधान मिळतं ? – माणसांवर प्रेम केल्यावर आणि भुकेल्याला जेऊ घातल्यानंतर मला समाधान मिळतं. ‘मंदिर, मस्जिद ना गया.. मै पढा ना अल्ला, राम भुके को खाना दिया मै किया ना दुजा काम’

देवावर किती विश्वास आहे ? – नाही. माणूस आणि निसर्गावर आहे.

दुःखी असतोस तेव्हा ? – गाणी ऐकतो

नास्तिक लोकांबद्दल काय सांगशील ? – देवाची चेष्टा नका करू. तसेच इतरांमध्ये r देवाविषयी नास्तिकता पसरवू नका.

देवभक्त असावं पण देवभोळं नसावं.. तुमचं मत काय ?

काम हाच देव. झाड तोडू नका. निसर्गात देव आहे.

इच्छा पूर्ण होण्यासाठी नवस करता का ?- नाही

ज्योतिषशास्त्रावर कितपत विश्वास आहे ? – मी याबाबत विचारायला कुठेही जात नाही.

उपवास करता का – नाही

अभिनय आणि भक्तीची सांगड कशी घालता ? – या दोन्हीसाठी मग्नता लागते. भक्ती म्हणजे कामाविषयीच प्रेम.

मूर्तीपूजा महत्त्वाची वाटते की प्रार्थना ? – पसायदान आवडतं. प्रार्थना महत्त्वाची वाटते.