जीतू रायला कांस्यपदक, जागतिक नेमबाजी स्पर्धा

44

नवी दिल्ली- हिंदुस्थानचा आघाडीचा नेमबाज जीतू रायने पिछाडीवरून जबरदस्त पुनरागमन करत जागतिक नेमबाजी स्पर्धेच्या १० मीटर एअर पिस्टल प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली. कर्णी सिंह शूटिंग रेंजवर झालेल्या अंतिम फेरीत २९ वर्षीय जीतू रायने ८ नेमबाजांमध्ये झालेल्या स्पर्धेत एकूण २१६.७ गुणांसह तिसरे स्थान पटकावले.

आशियाई क्रीडा स्पर्धा व जागतिक चॅम्पियनशिपमधील रौप्यपदक विजेता जीतू राय पहिल्या शॉटमध्ये ८.८ गुणांसह सातव्या स्थानी होता. त्यानंतर त्याने १०.६ व १० गुणांचा वेध घेत स्पर्धेत पुनरागमन केले. एकवेळ ९८.७ गुणांसह जीतू सहाव्या स्थानी होता. मात्र त्यानंतर दोन वेळा १०.६ गुणांचा वेध घेत तो पुन्हा शर्यतीत आला. शेवटी ९.९ गुणांसह जीतूने कास्यपदक निश्चित केले. जपानच्या तोमोयुकी मातसुदाने २४०.१ गुणांची कमाई करत सुवर्णपदक पटकावले, तर व्हिएतनामच्या जुआंग विंह होआंगने २३६.६ गुणांसह रौप्यपदकाची कमाई केली. ओमकार सिंह व अमनप्रीत सिंह या हिंदुस्थानी नेमबाजांनी या स्पर्धेत पात्रता फेरीत पराभव पत्करावा लागला.

आपली प्रतिक्रिया द्या