जे. जे. रुग्णालयात कॅन्सर सेंटर; अमित देशमुख यांची विधान परिषदेत घोषणा

532

जे. जे. रुग्णालयाला दीडशे वर्षे पूर्ण होत आहेत. वैद्यकीय शिक्षण विभाग हे वर्ष साजरे करणार असल्याचे सांगत जे. जे. रुग्णालयात कॅन्सर सेंटर सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आज विधान परिषदेत दिली.

जे. जे. रुग्णालयात हृदय शस्त्रक्रिया गेल्या सहा महिन्यांपासून बंद पडल्या असून जे. जे.सह कामा, जीटी आणि सेंट जॉर्ज या सरकारी रुग्णालयांनी केमिस्टची 60 कोटी रुपयांची बिले थकवल्याने औषधांचा पुरवठा बंद करण्यात आल्याचा मुद्दा सदस्य प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी लक्षवेधीद्वारे उपस्थित केला. सदस्य विक्रम काळे यांनी कॅन्सरचे वाढते प्रमाण बघता जे. जे. रुग्णालयात कॅन्सर सेंटर सुरू करण्याची मागणी केली. त्यावर उत्तर देताना अमित देशमुख यांनी जे. जे. रुग्णालायत कॅन्सर सेंटर सुरू करण्यासंदर्भातील धोरण राबवू अशी ग्वाही दिली. जे. जे.मध्ये हृदय शस्त्रक्रिया बंद पडलेल्या नसल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या