अमरनाथ यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, १६ ठार; २७ जखमी

37

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जम्मू-कश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेकरूंच्या बसला भीषण अपघात झाला आहे. अपघात जम्मू-श्रीनगर हायवेवरील रामबनजवळ घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. यात्रेकरूंनी भरलेली बस दरीमध्ये कोसळल्याने १६ भाविकांचा मृत्यू झाला असून, २७ जण जखमी आहेत. अपघातातील १९ भाविकांची प्रकृती गंभीर असल्याचे त्यांना विमानाद्वारे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर ८ जणांना किरकोळ दुखापत झाली आहे.

रामबन जिल्ह्यातील बनिहाल लगतच्या जम्मू-श्रीनगर महामार्गावर हा अपघात झाला. अअपघाताची माहिती मिळताच भारतीय लष्कराचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी सध्या बचावकार्याला सुरूवात केली आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला, हे अद्याप कळू शकलेले नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू- कश्मीरमध्ये झालेल्या बस अपघाताबाबत दु:ख व्यक्त केले असून, मृतांच्या नातेवाईबाबत संवेदना व्यक्त केल्या.

आपली प्रतिक्रिया द्या