जम्मू-कश्मीरमध्ये पुन्हा मोबाईल-इंटरनेट सेवा बंद

1804

सामना ऑनलाईन। श्रीनगर

जम्मू-कश्मीरमध्ये 370 कलम हटवल्यानंतर पसरणाऱ्या अफवा रोखण्यासाठी मोबाईल-इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर कश्मीरमधील परिस्थिती निवळल्याने शनिवारी ही सेवा सुरू करण्यात आली. मात्र रविवारी अफवांचे पेव फुटल्याने मोबाईल-इंटरनेट सेवा पुन्हा एकदा बंद करण्यात आली आहे. अफवा रोखण्यासाठी आणि जम्मू-कश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

जम्मू-कश्मीरमध्ये जवळ जवळ पंधरवड्यानंतर शनिवारी सकाळी जम्मू, सांबा, कठुआ, उधमपूर आणि इतर रहीवाशी जिल्ह्यांमध्ये टूजी इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली होती. पण त्याआधी काही भागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात असल्याचे बघून ही संचारबंदी शिथिल करण्यात आली. तसेच यावेळी जम्मूचे पोलीस महिनिरिक्षक मुकेश सिंह यांनी सोशल मीडीयावर अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा दिला होता. पण रविवारी काही भागात अफवा पसरल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे या भागातील मोबाईल-इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या