पाकिस्तानने आधी पाकव्याप्त कश्मीर सोडावे, ब्रिटीश खासदाराने ठणकावले

2326


पाकव्याप्त कश्मीर हा हिंदुस्थानचाच भूभाग असून पाकिस्तानने तो तत्काळ हिंदुस्थानच्या ताब्यात द्यावा, अशा शब्दात ब्रिटीश खासदार बॉब ब्लॅकमॅन यांनी पाकिस्तानला ठणकावले आहे. इंग्लडंमध्ये वसलेल्या कश्मीरी पंडितांच्या बलिदान दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

‘पाकिस्तान हिंदुस्थानविरोधात संयुक्त राष्ट्रात याबाबत रिझॉल्यूशन सादर करत आहेत. मात्र  ते पहिलं रिझॉल्यूशनकडे दुर्लक्ष करत आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या पहिल्या रिझॉल्यूशनमध्ये स्पष्ट नमूद केलं आहे की पाकव्याप्त कश्मीर हे जम्मू कश्मीरचाच हिस्सा आहे व तो त्यातच समाविष्ट केला जावा. त्यामुळे संपूर्ण जम्मू कश्मीर हे हिंदुस्थानचा भूभाग आहे. त्यामुळे पाकिस्ताने सर्वप्रथम त्यांचे लष्कर तेथून हटवावे व त्यांच्या ताब्यात असलेले कश्मीर हिंदुस्थानच्या ताब्यात द्यावे’ अशा शब्दात ब्लॅकमॅन यांनी पाकिस्तानची कानउघडणी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या