मालवाहतूकीसाठी जेएनपीटी ते दिल्ली असा नवीन रेल्व कॉरिडॉर लवकरच

32

सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा

जेएनपीटी ते दिल्ली असा नविन रेल्वे कॉरिडॉर निर्माण केला जाणार असून या कॉरीडोर साठी उरण आणि पनवेल तालुक्यातील भू-संपादनाची प्रक्रीया सुरू झाली आहे. या रेल्वे कॉरिडॉरमुळे जेएनपीटीतून आयात निर्यात होणाऱ्या मालाची वाहतूक सोयीस्कर होणार आहे. फक्त माल वाहतूकीसाठी हा कॉरिडॉर बांधला जाणार आहे. उरण तालुक्यातील जासई व पनवेल तालुक्यातील वहाळ, पाडेघर, वडघर, पिसार्वे आणि धानसर गावातील जमिन या साठी संपादित केली जाणार आहे.

हा कॉरीडॉर पुर्ण करण्यासाठी डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉर कार्पोरेशन ऑफ इंडीया हा भारत सरकारचा विभागाने पुढाकार घेतला आहे. यासाठी रायगड जिल्ह्यातील भूसंपादनाची जबाबदारी उरण मेट्रोसेंटरच्या उपजिल्हाधिकारी अश्विनी पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे. हा कॉरिडॉर पुर्ण झाल्यास रेल्वे विभाला परिपूर्ण व प्रभावशाली पद्धतीने ग्राहक सेवा पुरविणे व बाजाराच्या गरजा पुरविणे शक्य होणार आहे. या कॉरिडोरची कल्पना देशाच्या गरजा पूर्ण करून अर्थिक वृद्धीला आधारभूत म्हणून करण्यात आली आहे.मालाचे लवकरात लवकर वाहतूक करण्यासाठी ही सेवा फायदेशिर ठरणार आहे. या सेवेमुळे कृषी क्षेत्रापासून उद्योग क्षेत्रांना त्याचा फायदा मिळण्याची आशा आहे. महाराष्ट्रातील ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यातून हा कॉरिडोर जाणार आहे.

तिसऱ्या टप्प्यात उरण तालुक्यातील जासई व पनवेल तालुक्यातील वहाळ, पाडेघर, वडघर, पिसार्वे, धानसर येथिल भूसंपादनाची प्रक्रीया सूरू झाली आहे. या भूसंपादनामध्ये काही घरे बाधित होणार असून त्यांना इंदिरा आवास योजने प्रमाणे घरे बांधून देण्यात येणार आहेत. ज्याना या योजनेप्रमाणे घरे नको असतील त्यांना घराच्या बांधकामा इतकी अर्थिक मदत देण्यात येणार आहे. पनवेल तालुक्यातील रेल्वे व सिडको यांच्या जागेवर अतिक्रमण केलेली एकूण २८९ घरे यामध्ये बाधित होणार आहेत. उरण तालुक्यात देखिल काही ठिकाणी उरण-पनवेल रेल्वे मार्गालगत असलेली घरे यामध्ये बाधित होणार आहेत.

१५०४ किलोमिटर लांबीचा दोन मार्ग (२ बाय २५ केव्ही) ट्रॅक असून जेएनपीटी ते दादरी व्हाया वडोदरा-अहमदाबाद-पालनपुर-फुलेरा-रेवारी असा कॉरिडॉर पाच राज्यातून जाणार आहे. जेएनपीटीतून आयात होणारा माल व भारतातून निर्यात होणारा माल कंटेनर मार्फत या रेल्वेमार्गाने वाहून नेला जाणार आहे. २०२१-२२ पर्यंत हा कॉरिडॉर पुर्ण होण्याची शक्यता असून या मार्गावरून दरवर्षी १६.६० दशलक्ष टीयूई कंटेनरची वाहतूक होणार आहे. या कॉरिडोर मुळे रस्त्यावरील अवजड वाहनांची वाहतूक कमी होण्यास मदत होणार आहे.

रायगड जिल्ह्यातील भूसंपादन अधिकारी म्हणून मला प्राधिकृत केले असून उरण आणि पनवेल मध्ये भूसंपादनाची प्रक्रीया सूरू झाली आहे. उरण पनवेल तालुक्यात भूसंपादनासाठी जास्त अडचणी नाहीत. दोन्ही महामार्गाच्या मधून जून्या रेल्वे मार्गालगतच हा कॉरिडॉर जात आहे. यासाठी जमिन मालकांना प्रति हेक्टरी २.५ कोटी मोबदला देण्यात येणार आहे.– अश्विनी पाटील, भूसंपादन अधिकारी 

आपली प्रतिक्रिया द्या