अखेर न्यायालयाच्या आदेशाने जेएनपीटीत ट्रॉमा केअर सेंटर सुरू

62

सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा

जेएनपीटीमुळे वाढलेली प्रचंड वाहतूक आणि त्यातून होणाऱ्या अपघातातील रूग्णांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी जेएनपीटी रूग्णालयात ट्रॉमा केअर सेंटर सुरू करावे, ही गेल्या कित्येक वर्षाची उरणकरांची मागणी जेएनपीटीने मान्य केली असून शुक्रवारी या ट्रॉमा केअर सेंटरचे उदघाटन जेएनपीटीचे चेअरमन संजय सेठी (आयएएस) यांच्या हस्ते करण्यात आले. या ट्रॉमा केअरमुळे आत्ता उरणकरांना तातडीने उपचार मिळणार आहेत. हे ट्रॉमा केअर सेंटर एमजीएम हॉस्पीटलच्या सहकार्याने हे ट्रॉमा केअर सेंटर चालविण्यात येणार आहे.

उरण सामाजिक संस्थेने जेएनपीटी परिसरात होणार अपघात या बाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. मागील दहा वर्षांध्ये येथील रस्ता अपघातांध्ये सुारे ८०० पेक्षा जास्त तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे.तर अनेकांना अपंगत्व आले आहे. त्या अनुषंगाने न्यायालयाने जेएनपीटीला तातडीने ट्रॉमा केअर सेंटर उभारण्याचे आदेश दिले होते. हे ट्रॉमा केअर सेंटर एमजीएम रुग्णालयातील डॉक्टर यांच्या देखरेखीखाली २४ तास कार्यरत राहणार असल्याने जेएनपीटी बंदराच्या आसपासच्या लोकांना तातडीने उपचार मिळण्यासाठी उपयोगी पडणार असल्याचे जेएनपीटी बंदराचे चेअरमन संजय सेठी यांनी व्यक्त केले आहे. तर लवकरच या रूग्णालयात शस्त्रक्रीया सुरू करण्याचा मानस असून त्यासाठी एमजीएम रूग्णालयाशी बोलणी करणार असल्याचे सांगितले.

जेएनपीटी सध्या ५० बेडची सुविधा असणारे रुग्णालय चालवित आहे. त्याचा लाभ हा बंदरातील कामगार बरोबर आसपासच्या रुग्णांना, कामगारांच्या कुटुंबीयांना होतो. तसेच या बंदराने रुग्णालयात प्रधान मंत्री भारतीय जनऔषधी परियोजना सुरू केली आहे. त्याचा ही लाभ हा या परिसरातील सर्वसामान्य लोकांना होणार आहे. या बंदर परिसरात बळावणाऱ्या अपघाताची संख्या रोखण्यासाठी प्रत्येकानी वाहन चालविताना खबरदारी घेणे गरजेचे आहे, असा सबुरीचा सल्ला चेअरमन संजय सेठी यांनी यावेळी वाहनचालकांना, कामगार वर्गाला दिला आहे.

या कार्यक्रमाला जेएनपीटी व्यवस्थापक जयवंत ढवळे, जेएनपीटीचे वरिष्ठ अधिकारी, कामगार नेते दिनेश पाटील, सुरेश पाटील तसेच एमजीएम व जेएनपीटी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी , डॉक्टर, कर्मचारी, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये एमजीएम रुग्णालयाचे ४ डॉक्टर, ८ परिचारीका उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती एमजीएम रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या