मोदींच्या नावावर काहीतरी हवे, जेएनयूचे नाव बदलण्याची मागणी

484

भाजपचे खासदार आणि गायक हंसराज हंस यांनी दिल्लीतील प्रख्यात जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीचे (जेएनयू) ना बदलण्याबाबत वक्तव्य केले आहे. ‘जेएनयूचे नाव बदलून एमएनयू करावे. मोदींच्या नावाव  काहीतरी हवे’  असे वादग्रस्त विधान हंसराज हंस यांनी केले.

जेएनयूमध्ये अभाविपने शनिवारी आयोजित केलेल्याएक शाम शहीदों के नामया कार्यक्रमात हंसराज हंस सहभागी झाले होते. यावेळी जम्मूकश्मीरमधून कलम 370 हटण्याबाबत मत व्यक्त करताना केंद्र सरकारच्या निर्णयाचे त्यांनी समर्थन केले. आमच्या पूर्वजांनी केलेल्या चुकांची शिक्षा आम्ही भोगतोय. कश्मीरचा आता स्वर्ग होईल. आपण सर्व शांततेत राहू अशी प्रार्थना करू, असेही त्यांनी यावेळी म्हटले. मी जे बोलतोय ते ऐकायला विचित्र वाटेल पण मी म्हणतो जेएनयूचं नाव बदलून एमएनयू करावे. मोदींच्या नावावरदेखील काहीतरी हवे ना, असे हंसराज पुढे म्हणाले.

1969 साली हिंदुस्थानचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावावरून जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीची स्थापना करण्यात आली होती. हंसराज यांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शव्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या