देश तोडण्याची भाषा करणारा जेएनयूचा विद्यार्थी शरजील इमामला अखेर अटक

940

ईशान्येकडील राज्य आणि आसामला हिंदुस्थानपासून तोडण्याचे विखारी वक्तव्य करणारा जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा विद्यार्थी शरजील इमाम याला अटक करण्यात अखेर यश आले आहे. दिल्ली पोलिसांनी बिहारमधील जहानाबाद येथे त्याच्या मुसक्या आवळल्या.

राजधानी दिल्लीतील शाहीन बागमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात बोलताना शरजीलने हिंदुस्थानचे तुकडे करण्याची भाषा केली होती. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला. यानंतर त्याच्याविरोधात आसाम पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता.

दिल्ली पोलिसांनीही त्याच्याविरोधात कलम 153 अन्वये गुन्हा दाखल केला, तर उत्तर प्रदेशमधील अलीगड येथेही त्याच्याविरोधात गुन्ह्याची नोंद झाली होती. शरजीलच्या अटकेसाठी दिल्ली पोलीस, उत्तर प्रदेश पोलीस आणि बिहार पोलीस एकत्र कामाला लागली होती. यासाठी दोन पथक तयार करण्यात आली होती. अखेर दिल्ली पोलीस आणि बिहार पोलिसांना मंगळवारी त्याला अटक करण्यात यश आले.

घटनेची चौकशी व्हावी
हिंदुस्थानचे तुकडे करण्याचा डाव आखणे आणि व्हिडीओच्या माध्यमातून हा डाव सांगणे हा एक मोठ्या कटाचा भाग असून याची उच्च स्तरावर चौकशी करण्याची आवश्यकता आहे. हा देशांच्या अंतर्गत सुरक्षेलाही महत्त्व आहे, असे भारतीय जनता पक्षाचे नेते कैलाश विजयवर्गीय यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या