मराठी तरुणांनो, हे वाचा!

shivsena-logo-new

सामना ऑनलाईन, मुंबई

रेल्वे आणि स्टेट बँकेत लिपिक (क्लार्क) या पदांकरिता नोकरभरती होणार आहे. या नोकरभरतीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांची भरती झालीच पाहिजे तसेच भरतीत जास्तीत जास्त मराठी उमेदवार यशस्वी व्हावेत यासाठी स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले आहे.

हे वर्ग सोमवार, 20 मे रोजी संध्याकाळी 6.30 ते रात्री 8.30 या वेळेत शिवसेना भवन येथे होणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी नाव नोंदणी आणि अधिक माहितीसाठी स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ कार्यालय, शिवसेना भवन, दुसरा मजला येथे रविवार आणि सुट्टीचे दिवस वगळून सायंकाळी 6 ते 8 या वेळेत चिटणीस शरद एक्के, श्रीराम विश्वासराव, विलास जाधव यांच्याशी संपर्क साधावा. या प्रशिक्षण वर्गाचा लाभ जास्तीत जास्त मराठी उमेदवारांनी घ्यावा, असे आवाहन महासंघाचे चिटणीस, प्रशिक्षण वर्गप्रमुख उमेश नाईक यांनी केले आहे.