Blog – नोकरीनंतर व्यवसाय करू शकतो का?

anupriya-desai-astrologer>> अनुप्रिया देसाई  (ज्योतिष आणि वास्तु विशारद)

“अनुप्रिया नोकरीकरून आता कंटाळा आलाय. एवढी मेहनत करून शेवटी appreciation मिळत नाहीच. प्रमोशनसाठी डावले जाते. मग हीच मेहनत मी माझ्या व्यवसायासाठी का करू नये? आपल्याकडे कॅलिबर तर आहेच मग मी व्यवसाय का करू नये? हल्ली सतत हेच विचार येत असतात. स्वतःच्या व्यवसायात मला नफाही चांगला मिळेल. जे नुकसान होईल किंवा जो काही फायदा होईल तो माझ्यामुळे सर्वस्वी माझाच असेल. जसं नोकरीत यश हिरावून घेण्याची जी सतत भीती असते ती तरी स्वतःच्या व्यवसायात नाही,” असं चेतन म्हणाला.

आजच मला कविताने फोन केला होता. सरकारी बँकेत उच्च पदाची नोकरी. इतक्या वर्षांचा अनुभव. परंतु बँकेतुन सतत ट्रान्स्फर होईल ही भीती. 2015 साली बँकेतून ट्रान्स्फर होऊन ती तीन वर्षांसाठी बँगलोरला जाऊन आली. आता पुन्हा ट्रान्स्फरचे वारे बँकेत वहायला लागल्याने पुन्हा नव्याने सुरवात करायची? घर बदला, मुलांसाठी शाळा बदला. ह्या सर्वांत मुलांचे होणारे हाल. शाळासुद्धा कितीवेळा बदलणार? हे सर्व प्रश्न कवितासमोर होते. तिला स्वतःला कूकिंगची आवड. स्वतःचे छोटेसे बेकरी हाऊस सुरु करू का? घर सांभाळून व्यवसाय करता येईल. मुलांचीही परवड होणार नाही, असे तिचे म्हणणे.

माझ्याकडे सध्या भांडवल जमा आहे मग मी एखादे छोटेसे हॉटेल सुरु केले तर ? मी माझे पैसे Car मध्ये invest करून ती Car, Ola-Uber कंपनीत भाड्याने दिली तर? मी गावाकडे एखादी जमीन विकत घेऊन त्यावर काजू किंवा आंब्याची झाडे लावली आणि व्यवसाय सुरू केला तर?

असे अनेक प्रश्न मला गेल्या दोन-तीन वर्षात विचारले गेले आहेत. नोकरीत मेहनत करूनही प्रमोशनच्यावेळी डावलले जाणे, सुट्ट्या नाकारल्या जाणे, काही वेळेस हिणवले जाणे इत्यादींमुळे कंटाळलेल्या व्यक्तिंनी स्वतःचा व्यवसाय करण्याकडे मोर्चा वाळवलेला आहे. त्या सर्वांसाठी हा लेख.

नोकरीतून व्यवसायाकडे वळतांना स्वाभाविकपणे हा विचार केला जातो की, स्वतःचा व्यवसाय त्यामुळे रिपोर्टींग करणे, कोणाच्या ऑर्डर्स पाळणे, उत्तरदायी असणे (Answerable),काम करून सुद्धा नोकरीत दखल घेतली जात नाही,पगारवाढ नाही पण माझ्या स्वतःच्या व्यवसायात मी एवढीच मेहनत केली तर होणारा फायदा माझाच असेल, कधीही सुट्टी घेऊ शकेन, कुटुंबाला वेळ देऊ शकेन इ. आता खरंच ज्यांनी आपल्या बऱ्याच वर्षांची नोकरी सोडून व्यवसाय सुरू केला आणि व्यवसाय(ह्यात कपड्यांच्या व्यवसायापासून ते हॉटेल पर्यंतचे सर्व व्यवसाय केलेल्या व्यक्ति आहेत ) 2-3 वर्षे चालवला परंतु तरीही ते असमाधानी आहेत. त्याची कारणे त्यांना विचारल्यानंतर त्यांचे म्हणणे खालीलप्रमाणे – :

1) व्यवसायात म्हणावी तशी प्रगती नाही. बिझनेस आहे परंतु प्रॉफिट नाही. जितकी मिळकत तेवढाच खर्च. नफा असा नाही.

2) सुट्टी तर अजिबात घेता येत नाही. नोकरीत किमान शनिवार आणि रविवार मिळत होता आता कायमच काम करावे लागतेय. सुट्टीच्या दिवशीही व्यवसायात लक्ष घालावे लागतेय.

3) हाताखालची माणसे टिकत नाहीत. सर्वजण इथे कामाचे स्वरूप शिकून घेतात आणि शिकून झाल्यावर नोकरी सोडून जातात. म्हणजे पुन्हा आपल्यालाच सगळी कामे करावी लागतात.

4) ज्या महिन्यांत व्यवस्थित रिटर्न्स येत नाहीत त्या महिन्यांत तर दुकानाचे भाडे,सगळ्यांचे पगार,इतर खर्च काढणे अत्यंत कठीण जाते. आपल्याच खिशातून पैसे घालावे लागतात त्यामुळे अतिरिक्त कर्ज काढावे लागले इ.

हा प्रत्येकाचाच अनुभव आहे असं नाही, काही जणांना नोकरीतून व्यवसायात आल्यानंतर यश मिळाले आहे. बरीच उदाहरणे आहेत. जे व्यवसायात यशस्वी झाले आणि ज्यांना अडथळे आले त्या सर्वांच्या कुंडल्यांमध्ये तफावत जाणवली.

तफावत म्हणजे एकतर जे यशस्वी आहेत त्यांच्या कुंडलीत प्रथम स्थानात (लग्न स्थान ) स्थिर राशी आढळली. प्रथम स्थानात स्थिर राशी ह्याचा अर्थ वृषभ, सिंह किंवा वृश्चिक. ह्या तीनही राशी स्थिर तत्त्वाच्या आहेत. तर अशा व्यक्तिंचे विचारही उथळ नसतात. घेतलेला निर्णय हा बऱ्याच विचारांती घेतलेला असतो. त्यामागे सखोल अभ्यास करून मग नोकरी सोडण्याचा विचार असतो. वृषभ, सिंह आणि वृश्चिक फार काळ कोणाच्या हाताखाली काम करू शकत नाहीत. नोकरीत त्यांच्या स्वतंत्र विचारांना वाव कमी मिळत असल्याचे जाणवले की बऱ्याच विचारांती नोकरी सोडून व्यवसाय करण्याचा निर्णय घेतात. सिंह जसा जंगलाचा राजा तर सिंह लग्नाच्या व्यक्ति. त्यांच्यावर कोणी dominate केलेले त्यांना चालत नाही. नैसर्गिक कालपुरुषाच्या कुंडलीप्रमाणे सिंह ही पंचम स्थानात येणारी राशी. त्यामुळे मुळातच ह्यांना नोकरी करण्याचा फार उत्साह नसतो. काही काळ नोकरी केल्यानंतर स्वतःचा व्यवसाय करण्याची इच्छा प्रबळ होऊ लागते. वृश्चिक लग्नाबद्दल observation हे आहे ह्या व्यक्ति नोकरी आणि व्यवसाय दोन्ही मध्ये यश संपादन करू शकतात. ह्यांना आयुष्यात स्थैर्य थोडे उशिरा मिळते.

दुसरे महत्त्वाचे निरीक्षण म्हणजे पृथ्वीतत्वाच्या व्यक्तिंना यश मिळाले आहे. पृथ्वीतत्त्वाच्या लग्नांना आर्थिक समज इतरांपेक्षा चांगली असते. पृथ्वीतत्वाची लग्नराशी म्हणजे वृषभ, कन्या आणि मकर. ह्या तीनही राशी risk घेऊन यशस्वी होऊ शकतात. ह्याचे कारण म्हणजे ह्या तीनही राशींमध्ये काही वेगळे गुण आहेत. वृषभ राशीत कठोर मेहनत घेण्याची तयारी असतेच. कठोर परिश्रमाबरोबरच आपल्या Dealers आणि customers बरोबर खुबीने बोलण्याचे तंत्र त्यांना जात्यातच अवगत असते. कन्या राशी जर लग्न स्थानात असेल तर व्यक्तित मुळातच multitasking capacity असते. ह्यांना अनेक गोष्टीतून Income Source
वाढवण्याचे तंत्र अवगत असते. Dealers आणि customers ना बांधून ठेवण्याचे कसब ह्या व्यक्ति जाणून असतात. तिसरी पृथ्वीतत्त्वाची राशी आहे मकर. मकर ही चर तत्वाची राशी असली तरी नैसर्गिक कुडंलीप्रमाणे दशम स्थान दर्शवते, ह्यामुळे प्रामाणिकपणे नोकरी अथवा व्यवसाय करून यश संपादन करतात. नोकरी केली तर थेट रिटायर होईस्तोवर करतील. व्यवसाय करतील तर तो ही नेमाने. फार उथळ विचार नसल्याने नीटनेटका एकच व्यवसाय त्यात फार फेरफार न करता वर्षानुवर्षे सुरु असतो. हे कोणाच्या बोलण्याने वाहवत जात नाहीत(Influence) ह्यांनाही यश वयाच्या 35 ते 40 नंतर मिळते. नावलौकिक होतो. मिळालेल्या यशाचा फायदा पिढ्यानुपिढयांना मिळत असतो.

वर सांगितलेल्या लग्नराशीच्या लोकांव्यतिरिक्त इतर लोकांनी व्यवसाय करून ज्यांना यश संपादन करता आलेले नाही त्यांच्या कुंडलीत मुख्यतः मीन लग्न, कर्क लग्न आढळलेले आहे. मीन आणि कर्क ह्या जलतत्वाच्या राशी आहेत. मुळातच भावुक आहेत. ह्यांच्यात व्यावहारिक दृष्टिकोनाचा अभाव असतो. व्यवसायात अगदी ह्याच्या विपरीत गोष्टींची गरज असते. व्यावहारिक दृष्टिकोण असावाच लागतो आणि भावुक स्वभाव म्हणजेच फार emotional असून चालत नाही. ह्या लग्न राशीच्या लोकांना त्यांच्या व्यवसायिक भागीदाराकडूनच फसवणुकीचा सामना करावा लागतो. मेहनती असूनही झालेले नुकसान आणि फसवणूक ह्याला वैतागून पुन्हा मोर्चा नोकरीकडेच वळतो.

ह्या सर्व कुंडल्यांचा अभ्यास करता काही गोष्टी लक्षात आल्या त्या म्हणजे नोकरी करणाऱ्या व्यक्तिंना दर महिन्याला एक ठराविक रक्कम हाती येण्याची सवय झालेली असते. ते व्यवसायात लगेच शक्य होत नाही. व्यवसायात स्थिर होण्यासाठी काही कालावधी जावा लागतो परंतु तेवढे patience हवेत आणि प्रत्येक महिन्यांत नफा होतोच असे नाही. प्रत्येक व्यावसायिकाला वर्षातून काही काळ Off Season चा सामना करावा लागतो आणि तशी तरतूद ठेवावी लागते. नोकरी करणाऱ्या व्यक्तिने हा मुद्दा लक्षात जरी घेतला तर प्रश्न येतो तो हा की जर नफा झालाच नाही तरी दर महिन्याचं EMI भरायचे कसे. नोकरीच्या सुरवातीच्या काळात बँकेकडून कर्ज घेतलेले असते ते ह्या आधारावर की पुढे दर महिन्याच्या पगारातून EMI जाऊ शकेल. परंतु अचानक नोकरीतून व्यवसायात गेल्यानंतर घराचे हफ्ते, व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाचे हफ्ते आणि व्यवसायात लागणाऱ्या दर महिन्याच्या खर्चाचे गणित जमवतांना त्रेधातिरपीट उडू लागते. सरते शेवटी व्यवसायाला रामराम म्हणून पुनःश्च नोकरी करावी लागते.

ह्याचा अर्थ ठराविक राशीच्या लोकांनी व्यवसाय करूच नये असे मुळीच नाही. परंतु काहीवेळेस आपल्याला आपला स्वतःचा स्वभाव परिस्थितीनुसार लक्षात येतो. आपल्यात Anxiety Level किती आहे? सहनशक्ती किती आहे? ठराविक परिस्थिती आल्यांनतर त्याचा सामना करण्याची मानसिक,आर्थिक आणि शारीरिक क्षमता किती आहे ह्याची काही वेळेस कल्पनाच नसते. ह्याचे उत्तर तुमच्या कुडंलीतून मिळू शकते. तुमची लग्न राशी कुठल्या तत्वाची आहे? चरतत्व, स्थिरतत्व की द्विस्वभावातत्वाची आहे? तुमच्या व्यवसायाला कुंडलीतील दशम स्थानातील राशी आणि ग्रह सपोर्ट करत आहेत का ? निगेटिव्ह पॉईंट्स असल्यास काय काळजी घ्यायला हवी? कुंडलीतील महादशेप्रमाणे कुठला काळ तुमच्यासाठी कठीण असणार आहे ? आर्थिक तरतूद कशी आणि कधी करून ठेवल्यास नुकसान टाळता येईल. व्यवसाय करतांना भागीदारीत करावा का ? भागीदार फसवतील का ? व्यवसायातून झालेल्या नफ्याची गुंतवणूक कुठे केल्यास फायदा होऊ शकेल ? तुमच्या कुंडलीवरून आधीच ह्याबाबत माहिती घेतली आणि त्यावर workout करून व्यवसाय सुरू केल्यास तुम्हांला यश मिळण्यास मदत नक्कीच होणार आहे. घाईघाईत घेतलेल्या निर्णयामुळे पश्चाताप करण्यापेक्षा व्यवस्थित विचार करून घेतलेल्या निर्णयामुळे व्यवसायात स्थिरता लाभू शकेल.

पहा विचार करून !!

कसा वाटला हा लेख? प्रतिक्रिया जरूर कळवा – [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या