स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे नोकरभरती प्रशिक्षण

28

सामना प्रतिनिधी । मुंबई

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना नेते-खासदार गजानन कीर्तिकर, महासंघाचे कार्याध्यक्ष शिवसेना नेते-खासदार आनंदराव अडसूळ, महासंघाचे सरचिटणीस, शिवसेना सचिव-खासदार अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली नोकरभरती प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया (पी.ओ.)/ सारस्वत बँक (ज्यु. ऑफिसर)/टाटा हॉस्पिटल (क्लार्क) या पदांसाठी परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी स्पर्धात्मक लेखी परीक्षेत जास्तीत जास्त उमेदवार यशस्वी होण्यासाठी शिवसेना भवन येथे हे प्रशिक्षण वर्ग भरवण्यात येणार आहेत. ७ ते २१ जूनपर्यंत हे वर्ग भरणार असून ज्या उमेदवारांना या प्रशिक्षण वर्गांचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी नावनोंदणीसाठी शिवसेना भवन येथे शरद एक्के- ९८९२६९९२१५, श्रीराम विश्वासराव- ९८६९५८८४६९, विलास जाधव- ९६१९११८९९९ यांच्याशी सायंकाळी ६.३० ते रात्री ९.३० या वेळेत (रविवार व सुट्टीचे दिवस वगळून) संपर्क साधावा असे आवाहन महासंघाचे चिटणीस उमेश नाईक यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या