इस्रोत नोकरी करायचीय?

42

अमित घोडेकर
[email protected]

नोकरीच्या संधी शोधणं ही एक आम बाब. इस्रोत नोकरी करायची संधी मिळाली तर… सध्या तशी संधी उपलब्ध आहे.

८७ इंजिनीयर्सची भरती
इस्रोमध्ये संशोधक आणि इंजिनीयरच्या ८७ पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. हे अर्ज ७ मार्चपर्यंत ऑनलाईन भरायचे असून योग्य उमेदवारांना चांगली संधी आहे. ही पदे इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल आणि कॉम्प्युटर सायन्स या विभागांत भरायची असून या पदांसाठी शासकीय पद्धतीनुसार वेतनमान दिले जाणार आहे. ऑनलाईन अर्ज, त्यानंतर लेखी परीक्षा, त्यात मेरीटमध्ये येणाऱयांची पुन्हा परीक्षा, कागदपत्रांची तपासणी आणि अखेरीस मुलाखत यातून उमेदवारांना जावे लागणार आहे.

या पदांसाठी शैक्षणिक अर्हता इंजिनीयरिंगची (त्या त्या विभागातील) पदवी किंवा त्याच्याशी समकक्ष पदविका प्रमाणपत्र आवश्यक आहे. नियमानुसार या पदांमध्ये आरक्षणाचीही सोय सरकारने ठेवलेली आहे. या पदांसाठी अर्ज करताना वयोमर्यादा जास्तीतजास्त ३५ असावी असे नमूद करण्यात आले असून अर्ज भरताना १०० रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. अर्ज भरण्याची शेटवची तारीख ७ मार्च २०१७ असून अर्जाची रक्कम ८ मार्च २०१७पर्यंत भरता येईल. त्यानंतर ७ मे २०१७ रोजी लेखी परीक्षा घेतली जाईल.

गेल्या दशकात जगातील अवकाश संशोधनातील दादा कंपन्यांनी हिंदुस्थानला अवकाशयांनासाठी लागणारे क्रायोजेनिक इंजिनचे तंत्रज्ञान देण्यास नकार दिला तेव्हा इस्रोच्या शास्त्रज्ञांनी आणि इंजिनीअरनी हे आव्हान पेलले आणि जगातील सगळय़ात स्वस्त आणि उत्कृष्ट अवकाशयान बनवण्यास सुरुवात केली.

इस्रोच्या यशाचा सगळ्या हिंदुस्थानला अभिमान आहे. त्यामुळेच इस्रोमधील नोकरीच्या संधी अनेक युवकांना आजकाल आकर्षित करीत आहेत. अवकाशयान बनवणे किंवा ते अवकाशात अग्निबाणाचा वापर करून सोडणे, श्रीहरिकोटामधले ते अग्निबाण सुटत असतानाचे ते शेवटचे क्षण, हृदयाची होणारी धडधड यांचा अनुभव घेण्यासाठी अनेक जन आसुसले आहेत. इस्रो आता स्वतःसाठी आणि इतर अनेक देशासाठी उपग्रह आणि अवकाश संशोधन करत आहे. त्यामुळे इस्रोमध्ये अनेक वेगवेगळय़ा नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. इस्रोमधले शास्त्रज्ञ किंवा इंजिनीअर यांनीदेखील आपल्यासारखेच सर्वसामान्य घरातून येऊन स्वतःला सिद्ध केलेले आहे. त्यामुळेच इस्रोच्या संकेतस्थळावरदेखील लिहिले आहे की ‘‘फक्त आकाशच मर्यादा आहे का?’’

देशसेवा केल्याचा आनंद
इंजिनीयरिंग किंवा आणखी कोणतीही मोठी पदवी घेतल्यानंतर कोणत्या तरी कारखान्यात मशिनरींशी खेळत राहण्यापेक्षा इस्रोमध्ये आपली सेवा देऊन देशसेवा केल्याचा आनंद मिळवता येईल. याबरोबरच इस्रोमध्ये इतरदेखील अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. अगदी अकाउंटंटपासून ते संगणकचालक अशा अनेक संधी इस्रोमध्ये आहेत या सगळय़ा संधींबद्दल अधिक माहिती आपल्याला इस्रोच्या करीयरसाठीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. www.isro.gov.in/careers.
गेल्या आठवड्यात सगळ्या हिंदुस्तानसाठी एक अभिमानास्पद गोष्ट घडली, हिंदुस्तानच्या ईस्त्राे (इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने) एकाच वेळेस अवकाशात १०४ उपग्रह नेऊन सोडण्याचा मोठा भीम पराक्रम केला, असे एकाच वेळेस शेकडो उपग्रह अवकाशात सोडणारी इस्रो ही जगातील एकमेव संस्था झाली आहे. दोन वर्षांपूर्वीदेखील इस्रोने संपूर्ण हिंदुस्थानी बनावटीचे ‘‘चांद्रयान’’ हे यान चंद्राचा अभ्यास करण्यासाठी पाठवले होते.

 

आपली प्रतिक्रिया द्या