बायडेन सरकारचा मोठा निर्णय, पाकड्यांच्या चिंतेत वाढ…

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची धुरा सांभाळल्यानंतर जो बायडेन यांनी पाकिस्तानला पहिला झटका दिला आहे. अमेरिकेने दक्षिण आशियातील तीन देशांसाठी ट्रॅव्हल अॅडव्हायजरीत जाहीर केली आहे. ज्यामध्ये पाकिस्तानची यात्रा ही धोकादायक असल्याचे सांगण्यात आले आहे. अमेरिकेने आपल्या नागरिकांना पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानचा प्रवास करू नका असे सांगितले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी तिन्ही देशांसाठी वेगळी ट्रॅव्हल अॅडव्हायजरीत जारी केली आहे.

या अॅडव्हायजरीत सांगणायत आले आहे की, कोविड -19, दहशतवाद आणि जातीय हिंसाचाराचा विचार करून अमेरिकन नागरिकांनी पाकिस्तानला जाण्यापूर्वी पुनर्विचार करायला हवा. दहशतवाद आणि अपहरणांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने आपल्या नागरिकांना पाकिस्तानच्या बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा प्रांतात न जाण्याचा सल्ला दिला आहे.

अॅडव्हायजरीत अमेरिकन नागरिकांना दहशतवाद आणि सशस्त्र संघर्षाच्या शक्यतेमुळे हिंदुस्थान-पाकिस्तान सीमा (एलओसी) क्षेत्रापासून दूर राहण्यास सांगितले गेले आहे. अॅडव्हायजरीत सांगण्यात आले आहे की, हिंदुस्थान-पाकिस्तान सीमेजवळील भागात जाऊ नका, कारण या भागात अनेक दहशतवादी संघटना कार्यरत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या