डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात बेजबाबदार राष्ट्राध्यक्ष! जो बायडेन यांची टीका

डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात बेजबाबदार राष्ट्राध्यक्ष आहेत अशी टीका जो बायडेन यांनी केली आहे. राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत झालेला पराभव स्वीकारण्यास ट्रम्प अद्याप तयार नाहीत. त्यामुळे अमेरिकेतील लोकशाहीचे मोठे नुकसान होत असल्याचे मत बायडेन यांनी व्यक्त केले आहे. राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर प्रथमच बायडेन यांनी ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

काय म्हणाले बायडन

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत जो बायडेन यांनी तब्बल आठ कोटी मते मिळवली आहेत. तसेच विजयासाठी 270 इलेक्ट्रोल व्होट्स आवश्यक असतानाही बायडेन यांना 309 इलेक्ट्रोल व्होट्स मिळाली आहेत.

बायडेन यांचा एवढय़ा फरकाने निर्णायक विजय झालेला असतानाही ट्रम्प स्वतःचा पराभव मानायला तयार नाहीत. त्यांनी जॉर्जियात पुनर्मतमोजणीची मागणी केली होती, त्यामध्येही बायडेन विजयी ठरले आहेत.

ट्रम्प यांची सध्याची देहबोली आणि अडमुठी भूमिका पाहता इतिहासातील सर्वात बेजबाबदार राष्ट्राध्यक्ष असल्याचे बायडेन यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांच्या या वागण्यामुळे अमेरिकन लोकशाहीबाबत जगभरात चुकीचा संदेश जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या