Joe Biden – जो बायडन यांनी घेतली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ, मोदींनी दिल्या शुभेच्छा

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी बुधवारी रात्री 10 वाजता (हिंदुस्थानी वेळेनुसार) राष्ट्राध्यपदाची शपथ घेतली. बायडन यांनी अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे. बायडन यांना अमेरिकेच्या मुख्य न्यायाधिशांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. वाशिंग्टन येथील कॅपिटल हिल भागात अत्यंत कडेकोट बंदोबस्तामध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला.

शपथविधी सोहळ्याची सुरुवात उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्या शपथविधीने झाली. कमला हॅरिस हा अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष आहेत. उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरीस रात्री 10 वाजता शपथ घेतली आणि त्यानंतर राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा शपथविधी पार पडला. बायडन हे अमेरिकेच्या इतिहासात सर्वाधिक वयाचे राष्ट्राध्यक्ष आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांची दांडी

दरम्यान, मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केल्याप्रमाणे शपथविधी सोहळ्याला दांडी मारली. राजशिष्टाचार म्हणून त्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहणे अपेक्षित होते, मात्र ते अनुपस्थितीत राहिले.

मोदींनी केले अभिनंदन

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे अभिनंदन केले असून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. हिंदुस्थान-अमेरिकेतील संबंध आणखी मजबूत करण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध असल्याचेही त्यांनी आपल्या शुभेच्छा ट्विटमध्ये म्हटले.

आपली प्रतिक्रिया द्या