‘सरफरोश’च्या सिक्वेलमधून जॉन अब्राहम बाहेर, दिग्दर्शकासोबत वाद झाल्याची चर्चा

18

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बॉलिवूड अभिनेता आमिर खान याच्या सुपरहिट ‘सरफरोश’ या चित्रपटाच्या सिक्वेलमधून जॉन अब्राहम बाहेर पडला आहे. दिग्दर्शकासोबत झालेल्या वादानंतर जॉनने या चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. सरफरोशचा सिक्वेलचे दिग्दर्शन करणारे जॉन मॅथ्यू मॅथन यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. जॉन या चित्रपटामध्ये भूमिकाही साकारणार होता आणि सहनिर्माताही होता.

गेल्या वर्षी ‘सरफरोश’च्या सिक्वेलमध्ये काम करण्यास जॉनने होकार दिला होता. पीटीआयला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये जॉन म्हणता होता, जॉन मॅथ्यू मॅथन आणि मी एकत्रित या चित्रपटाची निर्मिती करत आहे. आमचे कथेवर काम सुरू आहे. चित्रपटाचे शूटिंग पुढच्या वर्षीपर्यंत सुरू होईल. परंतु आता त्याचे दिग्दर्शकासोबत वाजल्याने त्याने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

‘मिड डे’सोबत बोलताना जॉन मॅथ्यू मॅथन यांनी मात्र विचित्र वक्तव्य केले आहे. मी कधीही असे म्हटले नव्हते की जॉन माझ्या चित्रपटामध्ये काम करणार आहे आणि मी अन्य कोणत्याही अभिनेत्याचे नाव घेतले नव्हते. तसेच जॉनसोबत चित्रपटाबाबत फक्त चर्चा सुरू होती, असेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या