CAA वरून टीका करणाऱ्या कॉमेडियनचा व्हिडीओ हॉटस्टारने रोखला

1025
john-oliver

कॉमेडियन जॉन ऑलीवर याने आपला शो ‘लास्ट वीक टुनाइट विद जॉन ऑलीवर’ मध्ये हिंदु्स्थानसंदर्भात एक एपिसोड केला. यामध्ये CAA, NRC आणि NPR संदर्भातील सरकारची धोरणं, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या दोन दिवसाच्या हिंदुस्थान दौऱ्याबद्दल देखील टीका करण्यात आली. त्यानंतर नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ ट्रोल केला, अखेर OTT प्लॅटफॉर्मवरून हा व्हिडीओ हटवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.तर अनेक रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की राजकीय टीका करण्यात आल्याने हा एपिसोड अपलोड करण्यात आला नाही.

19 मिनिटांचा हा व्हिडीओ युट्यूबवर उपलब्ध आहे. जॉन ऑलीवरने मोदी सरकारवर टीका करत निर्णयांची खिल्ली उडवली होती. तसेच CAA विरोधात आंदोलन करणाऱ्यांप्रति मोदी सरकार योग्य भूमिका घेत नसल्याचेही यामध्ये म्हणण्यात आले होते.

शो च्या शेवटच्या टप्प्यात त्याने ताज महलला प्रेमाचे प्रतीक तर मोदी सरकारचे राजकारण म्हणजे द्वेषाचे प्रतीक असल्याची टीका त्यांनी केली होती. यामुळे शो संदर्भात नेटकऱ्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. अखेर हा एपिसोड हटवण्यात आल्याचे बोलले जात आहे. या आधी 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीआधी आंतरराष्ट्रीय कॉमेडिअन हसन मिन्हाज याने मोदींच्या पहिल्या कार्यकाळावर टीका होती, त्याला हाउडी मोदी या कार्यक्रमात जाण्यापासून रोखण्यात आले होते.

दरम्यान, सीएए-एनआरसी वर मोदी सरकारच्या भूमिकेवर अनुराग कश्यप, विशाल भारद्वाज, स्वरा भास्कर, तापसी पन्नू, ऋचा चढ्ढा, अली फजल, जावेद जाफरी, फरहान अख्तर, जावेद अख्तर, शबाना आजमी, महेश भट्ट, सोनी राजदान अशा कलाकारांनी विरोध दर्शवला आहे. सीएए-एनपीआर-एनआरसीवरून समर्थक आणि विरोधकांमध्ये झालेल्या हिंसाचारमध्ये दिल्लीत आतापर्यंत एकूण 27 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

दिल्लीत परिस्थिती गंभीर, लष्कर बोलवा; मुख्यमंत्री केजरीवाल यांचे केंद्र सरकारला साकडे

नागरिकत्व सुधारित कायद्यावरून (सीएए) उसळलेल्या आगडोंबामुळे दिल्लीतील परिस्थिती फारच स्फोटक आणि गंभीर आहे. दिल्ली पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणली जाऊ शकत नाही. पोलिसांचे प्रयत्न कमी पडत आहेत. त्यामुळे तातडीने लष्कराला पाचारण करावे अशी मागणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. याबाबत आपण गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करणार असल्याचे ते बुधवारी म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या