जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटक, 33 हजार डबे परत मागवले

1177

बाळांसाठीच्या उत्पादनांसाठी प्रसिद्ध अशा जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. कंपनीच्या बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटक सापडल्याने तब्बल 33 हजार डबे परत मागवण्यात आले आहेत.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, या कंपनीच्या पावडरमध्ये अॅसबेस्टस नामक घटक सापडला आहे. या घटकामुळे कर्करोग होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे अमेरिकेच्या आरोग्य नियामक मंडळाने हा अहवाल जारी केला आहे. त्यामुळे अमेरिकेतील पावडरीचे 33 हजार डबे परत मागवले आहेत. याचा परिणाम जॉन्सनच्या शेअर्सवर झाला आहे. अमेरिकेत जॉन्सनचे शेअर्स 6 टक्क्यांनी घसरले आहेत.

हिंदुस्थानातही जॉन्सन ऍण्ड जॉन्सन कंपनीच्या बेबी शॅम्पूवर बंदी घालण्यात आली होती. या कंपनीच्या बेबी शॅम्पूमध्ये ‘फॉर्मेल्डिहाइड’ हे हानीकारक रासायनिक तत्व आढळल्यामुळे उत्तर प्रदेश प्रशासनाने ते उत्पादन बंद करण्याचे आदेश दिले होते.

आपली प्रतिक्रिया द्या