जॉनी बेअरस्टोचा धमाका, इंग्लंडची टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी

जॉनी बेअरस्टोने केलेल्या नाबाद 86 धावांच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर इंग्लंडच्या क्रिकेट संघाने शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या पहिल्या टी-20 लढतीत यजमान दक्षिण आफ्रिकेवर पाच गडी राखून दणदणीत विजय मिळवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. जॉनी बेअरस्टोने 48 चेंडूंत चार षटकार व नऊ चौकारांसह नाबाद 86 धावांची खेळी साकारली. त्याचीच सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.

दक्षिण आफ्रिकेकडून मिळालेल्या 180 धावांचा पाठलाग करणाऱया इंग्लंडने पाच गडी गमावत विजयी लक्ष्य ओलांडले. सहाव्या षटकांत इंग्लंडची अवस्था 3 बाद 34 धावा अशी झाली होती. पण जॉनी बेअरस्टो व बेन स्टोक्स या जोडीने चौथ्या विकेटसाठी 85 धावांची भागीदारी रचत इंग्लंडच्या विजयाची आस कायम ठेवली. बेन स्टोक्स 37 धावांवर बाद झाल्यानंतर जॉनी बेअरस्टोने एकाहाती सामना जिंपून दिला. जॉर्ज लिंडे व लुंगी एनगिडी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

दरम्यान, याआधी इंग्लंडने नाणेफेक जिंपून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. दक्षिण आफ्रिकेकडून कर्णधार, यष्टिरक्षक क्विण्टॉन डी का@कने 30 धावांची, फाफ डय़ुप्लेसिसने 58 धावांची, रासी वॅन डर डय़ुसेनने 37 धावांची खेळी केली. इंग्लंडकडून सॅम करणने 28 धावा देत तीन फलंदाज गारद केले. तसेच जोफ्रा आर्चर, टॉम करण व ख्रिस जॉर्डन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

आयपीएल आली कामाला
इंग्लंड व दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये केपटाऊन येथे पहिला टी-20 सामना रंगला. या लढतीत इंग्लंडने वर्चस्व दाखवले. या लढतीचे वैशिष्टय़ ठरले ते आयपीएलमध्ये चमकलेल्या खेळाडूंनी उमटवलेला ठसा. जॉनी बेअरस्टो, ख्रिस जॉर्डन, सॅम करण, जोफ्रा आर्चर या इंग्लंडच्या आणि क्विण्टॉन डी का@क, फाफ डय़ुप्लेसिस या दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी आयपीएलमध्ये शानदार कामगिरी केली होती. या सर्व खेळाडूंनी या आंतरराष्ट्रीय लढतीत आपल्या देशासाठी खेळतानाही चुणूक दाखवली. याचा अर्थ आयपीएलमधला सराव येथे कामाला आला.

आपली प्रतिक्रिया द्या