जोकरने प्रेक्षकांना वेड लावले, ‘तसल्या’ चित्रपटांमध्ये ठरला सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

1636

टॉड फिलीप्स दिग्दर्शित आणि जोआकीम फिनिक्स अभिनीत ‘जोकर’ चित्रपटाने सगळ्यांना आश्चर्यचकीत केलं आहे. फक्त प्रौढांसाठी असलेल्या चित्रपटांमध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून या चित्रपटाने अव्वल क्रमांक मिळवला आहे. या चित्रपटाने शुक्रवारपर्यंत 100 कोटी डॉलर्सची कमाई केली आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या 7 आठवड्यातच या चित्रपटाने ही कमाई केली आहे. आतापर्यंत इतकी कमाई करणारे 40 हून अधिक चित्रपट आहेत. मात्र फक्त प्रौढांसाठी विभागातील हा पहिलाच चित्रपट आहे ज्याने इतकी कमाई केली आहे.

हे देखील वाचा- ह्यॅ…ह्यॅ…ह्यॅ…करणारा चित्रपटातील जोकर पॉर्नसाईटवर ट्रेंडीगमध्ये

‘जोकर’ हे काल्पनिक पात्र असून बॅटमॅन मालिकेतील तो प्रमुख खलनायक दाखवण्यात आला आहे. टॉड फिलिप्स यांनी जोकर खलनायक कसा बनला हे मोठ्या पडद्यावर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आत्यंतिक हिंसा चित्रपटात दाखवण्यात आल्याने या चित्रपटाला फक्त प्रौढांसाठीचा असे सेन्सॉर बोर्डाने सर्टिफिकेट दिले आहे.

100 कोटी डॉलर्सपेक्षा अधिकची कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये सुपरहिरोंचेच चित्रपट जास्त असल्याचं दिसून आलं आहे. पहिल्या क्रमांकावर अॅक्वामॅन असून त्याने 104 कोटी डॉलर्सपेक्षा अधिकची कमाई केली आहे. स्पायडरमॅन फार फ्रॉम होमने 103 कोटी डॉलर्सची कमाई केली आहे. या चित्रपटांच्या आणि जोकरच्या कमाईमधला सगळ्यात मोठा फरक हा आहे की ‘जोकर’ ने ही कमाई चीनमध्ये प्रदर्शित न होता देखील केली आहे. इतर दोन्ही चित्रपटांना चीनमध्ये चांगला फायदा झाला होता. जर या चित्रपटाने 100 कोटी 50 लाखांपेक्षा जास्तची कमाई केली तर तो ख्रिस्तोफर नोलानच्या द डार्क नाईट या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीतील मात्र चीनमध्ये प्रदर्शित न झालेल्या चित्रपटालाही मागे टाकेल.

आपली प्रतिक्रिया द्या