जोकर नाचलेल्या पायऱ्या जगप्रसिद्ध झाल्या, फोटो काढण्यासाठी पर्यटकांची तुफान गर्दी

1153

ऑक्टेबर मध्ये प्रदर्शित झालेल्या जोकर या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. हिंदुस्थानातच या चित्रपटाने 50 कोटी पेक्षा जास्त गल्ला जमवला आहे.  चित्रपटात न्यूयॅार्कमधली एक जागा दाखवण्यात आली आहे. या दृश्यामुळे ती जागा तुफान प्रसिद्ध झाली आहे. येथे येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून ती न्यूयॅार्कमधल्या यँकी स्टेडीयम, ब्रॉन्क्स जू आणि न्यूयॉर्क बॅाटॅनिकल गार्डनसारख्याच या पायऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत.

joker1

चित्रपटातील एका दृश्यात जोकरची भूमिका साकारणारा अभिनेता जोआकीम फिनीक्स या पायऱ्यांवर नाचताना दाखवण्यात आलं आहे. हे दृश्य पाहिल्यानंतर अनेकांनी ही जागा नेमकी कोणती आहे ते शोधून काढलं आणि ती पाहण्यासाठी गर्दी करायला सुरुवात केली. या पायऱ्या सोशल मिडीयावरही बऱ्याच प्रसिद्ध झाल्या आहेत. इथे येणारे पर्यटक जोकर चित्रपटात जोआकीम फिनिक्स जसा नाचलाय तसं नाचतानाचे व्हिडीओ आणि फोटो काढायला लागले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर अपलोड केल्याने जोकर चित्रपटातील पायऱ्या काही सेकंदात पोहोचल्या आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी या पायऱ्या चोरांचा आणि गुन्हेगारांचा अड्डा होत्या. वाढत्या गर्दीमुळे या पायऱ्यांवरील गुन्हेगारांचं राज्य संपल्यात जमा झालं आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या