समर्थ महाकवे हिंदुस्थानी संघात, जॉर्डन येथील आशियाई कुस्ती स्पर्धेत खेळणार

नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या 17 वर्षाखालील मुलांच्या ग्रीको रोमन कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या 55 किलो वजनी गटाच्या निवड चाचणी स्पर्धेतून मुंबईकर कुस्तीपटू समर्थ महाकवेची निवड करण्यात आली आहे. आता तो येत्या 22 ते 30 जून दरम्यान जॉर्डन येथे खेळल्या जाणाऱया 17 वर्षाखालील मुलांच्या ग्रीको रोमन आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करील.

वयाच्या दहाव्या वर्षापासून कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी तालमीत कुस्तीचे धडे गिरवत असलेल्या समर्थच्या काwशल्याला विकसित करण्यासाठी साइने (हिंदुस्थानी क्रीडा प्राधिकरण) त्याची मुंबई पेंद्रासाठी निवड केली. गेली सात वर्षे कुस्तीच्या मॅटवर घाम गाळत असलेल्या समर्थने शेकडो स्पर्धांमध्ये आपले कुस्तीकाwशल्य दाखवले असून जॉर्डन येथे आयोजित होणारी पहिली आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा असेल. 2028 साली होणाऱया ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानला पदक जिंकून देणे हेच ध्येय त्याने डोळय़ांसमोर ठेवले आहे. नुकत्याच सोनीपत येथे पार पडलेल्या कुस्ती विदेशी प्रदर्शनात समर्थने जोरदार कामगिरी केली होती. या प्रदर्शनातून समर्थसह चार खेळाडूंची बिश्केक (किर्गिझस्तान) येथे होणाऱया आंतरराष्ट्रीय सराव शिबिरासाठी समर्थची निवड करण्यात आली आहे.