पॉर्न स्टार बनवण्याचं आश्वासन देत पत्रकाराचा ६ जणींवर बलात्कार

33

सामना ऑनलाईन, वॉशिंग्टन

अमेरिकेतील सिअॅटलमधील पत्रकार मॅट हिकी याला ६ महिलांनी केलेल्या तक्रारींमुळे तुरुंगात जावं लागलंय. या महिलांना त्याने पॉर्न स्टार बनवण्याचं आस्वासन देत घरी बोलावलं होतं, त्यानंतर जे काही झालं त्यामुळे या महिलांनी त्याच्याविरोधात तक्रार केली आहे. २०१६ साली त्याच्यावर पहिला आरोप करण्यात आला होता. या प्रकाराला अमेरिकेत पॉर्न स्कॅम नाव देण्यात आलं आहे.

matt-hickey

अनेक तरुणींना हिकीने तो पॉर्न चित्रपटांमध्ये संधी देणारा माणूस असल्याचं खोटं सांगितलं होतं. यातील काही तरुणी त्याच्या खोटं बोलण्याला फसल्या, या तरुणींना तो घरी बोलवायचा आणि त्यांचे नग्न फोटो काढायचा. यानंतर हिकीने आपल्यावर बलात्कार केला असं तक्रार करणाऱ्या तरुणींनी म्हटलं आहे.  आत्तापर्यंत ६ महिलांची तक्रार केली असली तरी हा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या