हाफीज सईदवर लाहोरमध्ये 7 डिसेंबर रोजी सुनावणी

633
hafeez-sayid-1

मुंबईवरील ‘26/11’च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार जमात उद दावाचा म्होरक्या हाफीज सईद याच्यावरील दहशतवादाला अर्थपुरवठा केल्याच्या आरोपावरून दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी 7 तारखेस दहशतवादविरोधी न्यायालयात होणार आहे, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

लाहोरमधील दहशतवादविरोधी न्यायालयात 7 डिसेंबर रोजी सईद याच्यावरील सुनावणीस सुरुवात होणार आहे. त्याच्यासह आणखीही काही जणांवर सुनावणी होणार आहे. या प्रकरणात दररोज सुनावणी घेऊन हे प्रकरण लवकरात लवकर निकाली काढण्याची विनंती वकील अब्दूर रौफ भट्टी यांनी न्यायालयाला केली आहे.

या विनंतीला सईदच्या वकिलांनी विरोध केला आहे. हे प्रकरण सबळ पुराव्यांच्या आधारे निकाली काढण्यात यावे, असे या वकिलाने म्हटले आहे. दरम्यान, शनिवारच्या सुनावणीसाठी हाफीज सईदला कडक बंदोबस्तात कोट लखपत तुरुंगातून न्यायालयात आणण्यात आले. पत्रकारांना न्यायालयात येण्यास मनाई करण्यात आली होती. सईदवर 23 एफआयआर नोंदवण्यात आले असून पंजाब प्रांतातील दहशतवादी कारवायांना आर्थिक रसद पुरवल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. सईदला 17 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. तेव्हा पासूनच त्याला लाहोरमधील कोट लखपत तुरुंगात ठेवण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या