न्यायालयाचा हस्तक्षेप वाढलाय, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे मत

न्यायालयांच्या काही निर्णयांमुळे न्याय पालिकेचा हस्तक्षेप वाढला आहे असे दिसत असल्याचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू म्हणाले. नायडू यांनी फटाक्यांच्या बंदीवरील न्यायालयाचे निर्णय आणि न्यायाधीशांच्या नियुक्तीत प्रशासनाच्या हस्तक्षेपास न्यायपालिकेने दिलेल्या नकाराचं उदाहरण त्यांनी दिलं.

अखिल भारतीय पीठासन अधिकाऱयांच्या 80व्या परिषदेत नायडू बोलत होते. एकमेकांबद्दल आदर, उत्तरदायित्व आणि संयम राखणं आवश्यक आहे. दुर्दैवाने अशा अनेक घटना घडल्या आहेत. ज्यातून मर्यादांचं उल्लंघन झालं आहे. असे अनेक न्यायालयीन निर्णय घेण्यात आले होते ज्यात हस्तक्षेप झाल्याचं दिसतेय असे नायडूंनी सांगितलं.

दिवाळीला फटाक्यांवर निर्णय देणारी न्यायपालिका मात्र न्यायाधीशांच्या नियुक्तीत प्रशासनाच्या हस्तक्षेपास नकार देते. या कृतींमुळे राज्यघटनेने आखून दिलेल्या सीमांचे उल्लंघन केले गेले, जे टाळता आले असते असे व्यकय्या नायडू यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या