अनोखी परंपरा! 21व्या वर्षांपर्यंत मुलगी ‘व्हर्जिन’ राहिली तर घरचे देतात पार्टी

प्रत्येक देशाला, प्रांताला किंवा समाजवर्गांना त्यांच्या अशा परंपरा असतात. काही चांगल्या, काही वाईट, काही विलक्षण! दक्षिण आफ्रिकेतील एका जमातीमध्येही एक विशिष्ट परंपरा आहे. इथे घरची मुलगी 21व्या वर्षापर्यंत कुमारी राहिली तर तिच्या घरचे त्याचं मोठं सेलिब्रेशन करतात.

काय आहे ही प्रथा

दक्षिण आफ्रिकेतील जुलू नावाची ही जमात आहे. गेल्या अनेक दशकांपासून ही परंपरा साजरी केली जाते. घरच्या मुलीची 21 वर्षं पूर्ण होईपर्यंत जर तिचा कौमार्यभंग झाला नाही, तर तिच्या घरच्यांना मोठी पार्टी द्यावी लागते. तिच्या सन्मानार्थ बळी देण्यात येतो आणि तिला खूप भेटवस्तू आणि पैसेही मिळतात. या परंपरेला उमेमुलो असं म्हणतात.

थेंबेला नावाच्या एका जुलू महिलेने आपल्या लेखात या परंपरेचा उल्लेख केला आहे. महिलेला या परंपरेचं पालन करावंच लागतं. जर तुम्ही असं केलं नाही, तर तुमचा कौमार्यभंग झाला आहे, असं समजलं जातं आणि जुलू जमातीत लग्नापूर्वी शारीरिक संबंध येणं अपवित्र मानलं गेलं आहे, असं थेंबेला सांगतात.

त्यांनी त्यांच्यावेळच्या परंपरेचाही त्यात उल्लेख केला. त्यांनाही त्यावेळी तब्बल 50 हजार रुपयांच्या भेटवस्तू मिळाल्या असल्याचं त्या लिहितात. तसंच, या वेळी मुलीच्या घरचे लोक खूप पैसे खर्च करतात. या परंपरेतील विधींमध्ये काही वावगं घडलं तरीही मुलीवर कुमारी नसल्याचा संशय घेण्यात येतो, असं त्या म्हणतात.

विशेष म्हणजे त्याच जमातीच्या पुरुषांसाठी मात्र, अशी कोणतीही प्रथा परंपरा नसते. हे फक्त मुलींसाठीच असतं. आणि मुलींना कोणत्याही परिस्थितीत या परंपरेला सामोरं जावं लागतं, असंही थेंबेला यांनी नमूद केलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या