हिंदुस्थान ज्युनिअर हॉकी वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत

90

सामना ऑनलाईन । लखनौ

अत्यंत चुरशीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या हॉकी संघावर हिंदुस्थानी हॉकी संघाने विजय मिळवत ज्युनिअर हॉकी वर्ल्ड कप स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. हिंदुस्तानच्या विजयामुळे क्रीडा प्रेमींनी जल्लोष केला.

आज झालेल्या उपांत्य फेरीत हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघानी तगडी झुंज दिली. दोन्ही संघानी एकमेकांवर २-२ गोल झळकावले होते. त्यानंतर शूट आऊटमध्ये हिंदुस्थानच्या खेळाडूंनी कमाल केली आणि ४-२ अशा फरकाने सामना जिंकत अंतिम फेरीत धडक मारली. आता शेवटच्या सामन्यात हिंदुस्थानसमोर बेल्जियमच्या संघाचे आव्हान असणार आहे.
दरम्यान, या आधी गुरुवारी झालेल्या सामन्याच्या ५५व्या मिनिटांपर्यंत पिछाडीवर असलेल्या हिंदुस्थानने दमदार पुनरागमन करत स्पेनचा २-१ ने पराभव केला होता.

आपली प्रतिक्रिया द्या