न्यायाधीश लोया मृत्यू प्रकरणातील पोलीस अधिकाऱयाचा मृत्यू

856

न्यायाधीश लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी लवकरच होणार अशी चर्चा सुरू असतानाच या प्रकरणाशी संबंधित एका पोलीस अधिकाऱयाचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. रवींद्र थोरात असे या पोलीस अधिकाऱयाचे नाव असून हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाला आहे.

गुजरातमधील सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणाच्या सुनावणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश ब्रिजगोपाल लोया यांचा नागपूर येथे 2014 साली मृत्यू झाला. राज्य गुप्तचर विभागाचे तत्कालीन प्रमुख संजय बर्वे यांच्या पथकात रवींद्र थोरात काम करत होते. थोरात यांच्याजवळ लोया मृत्यू प्रकरणाशी निगडित महत्त्वाच्या कागदपत्रांची तसेच लोया यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याची जबाबदारी होती. थोरात सध्या लाचलुचपत शाखेत उपअधीक्षक म्हणून काम पाहत होते. छातीत दुखत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु 13 जानेवारीदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या