सुरक्षित विमानप्रवास महत्त्वाचा

13

सामना प्रतिनिधी । मुंबई

विमानातील सदोष इंजिनांमुळे प्रवाशांमध्ये सध्या भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. विमानातून प्रवास करताना प्रवाशांना कोणतीही भिती वाटता कामा नये यासाठी नागरीउड्डाण महासंचालनालयाने काळजी घेतली पाहीजे, प्रत्येक नागरीकाचा विमानप्रवास सुरक्षित होणे महत्वाचे आहे असे मत न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

इंजिनची निर्मीती करणाऱ्या प्रॅट ऍण्ड व्हिटनी कंपनीनेही इंजिनामध्ये सदोष असल्याची बाब मान्य करत नागरी उड्डाण महासंचालनालयाने (डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हील एव्हिएशन) याप्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर केले. हवाई सुरक्षा हि अत्यंत महत्वाची बाब असल्याचे खंडपीठाने डिजीसीएला सांगितले.

१२ विमाने ग्राऊंडेड

इंडिगो एअर लाइनची बाजू मांडणारे ऍड जनक द्वारकादास यांनी यावेळी सांगितले की ९ विमाने उभी करुन ठेवण्यात आली आहेत तर ६ विमाने बदलण्यात आली आहेत तर गो एअरची बाजू मांडणारे ऍड वेंकटेश धोंड यांनी ३ विमाने उभी करण्यात आली असून दोन विमानांचे इंजिन बदलण्यात आल्याची माहिती खंडपीठाला दिली. याप्रकरणी पुढील सुनावणी १६ एप्रिल रोजी होणार आहे.

प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

देशातल्या देशात हवाई वाहतूक करणाऱ्या इंडिगो आणि गो एअर लाईन्सच्या ए ३२० निओ या विमानांमधील ४५०सिरीजचे इंजिन सदोष आढळल्याने सुमारे १४ विमाने तात्काळ सेवेतून कमी करण्यात आली होती. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भितीचे वातावरणही निर्माण झाले होते. याप्रकरणी हरीष अग्रवाल यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर  याप्रकरणी सुनावणी घेण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या