नवीन सरन्यायाधीश पदासाठी गोगोईंकडून न्यायमूर्ती बोबडेंची शिफारस

970
justice-bobade

सरन्यायाधीश रंजन गोगोई पुढील महिन्यात 17 तारखेला निवृत्त होत आहेत. यामुळे नवीन सरन्यायाधीश कोण असणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. यापार्श्वभूमीवर गोगोई यांनी केंद्र सरकारकडे नवीन सरन्यायाधीश पदासाठी न्यायमूर्ती अरविंद शरद बोबडे यांच्या नावाची शिफारस केली आहे. यामुळे न्यायमूर्ती बोबडे पुढील सरन्यायाधीश असतील अशी चर्चा आहे.

न्यायमूर्ती बोबडे सध्या रामजन्मभूमीसंदर्भातील खटल्याची सुनावणी करणाऱ्या खंडपीठात सहभागी आहेत. तसेच याव्यतिरिक्त अनेक महत्वपूर्ण खटल्याच्या निर्णयांमध्येही त्यांचा समावेश आहे. बोबडे यांचा जन्म 24 एप्रिल 1956 साली नागपुर येथे झाला असून त्यांनी नागपूर विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले आहे. 1978 साली न्यायमूर्ती बोबडे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्रबरोबर जोडले गेले. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठात त्यांनी विधी अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर 1998 साली ते ज्येष्ठ वकील झाले.  2000 साली त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून पद ग्रहण केले. त्यानंतर ते मध्य प्रदेश उच्च न्यायालयातून सरन्यायाधीश झाले. त्यांनी 2013 साली सर्वाैच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून पद सांभाळले. ते 23 एप्रिल 2012 साली निवृत्त होत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या