सरन्यायाधीशपदी शरद बोबडे; शपथविधी पूर्ण

983
sharad-arvind-bobde-cji

हिंदुस्थानचे 47वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी सोमवारी 18 नोव्हेंबर रोजी शपथ घेतली. विशेष बाब म्हणजे सरन्यायाधीशपदावर विराजमान होणारे बोबडे हे चौथे मराठी न्यायमूर्ती आहेत.

यापूर्वी पी. बी. गजेंद्र गडकर, यशवंत चंद्रचूड आणि व्ही. एन. खरे यांना हा बहुमान मिळाला आहे. न्याय. बोबडे पुढील 17 महिने सरन्यायाधीशपदी राहणार आहेत.

कोण आहेत शरद बोबडे

न्यायाधीश शरद बोबडे यांचा जन्म नागपूरमध्ये 24 एप्रिल 1956 साली झाला. कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी वकिली सुरू केली. 1978 साली ते महाराष्ट्र बार काऊन्सिलचे सदस्य बनले. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे काम पाहिले. त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून 2000 साली नियुक्ती झाली. त्यानंतर मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश तर 2013मध्ये ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले.

लेख – ‘सर्वोच्च’ मराठी पर्व!

 

आपली प्रतिक्रिया द्या