बंद पडलेली राष्ट्रीय पशुधन योजना पुर्ववत करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा – डॉ. संतोष मुंडे

17

सामना प्रतिनिधी । परळी वैद्यनाथ

राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत महाराष्ट्र पशुधन विकास मंडळामार्फत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये दिनांक 1 ऑक्टोबर 2015 ते 31 मार्च 2017 या कालावधीकरीता पशुधन विमा योजना राबविण्यात आलेली होती. 2017 पासून ही योजना बंद पडलेली आहे. तरी राज्याचे पशुधन आयुक्त यांना वारंवार जाब विचारूनही ही योजना सुरू झाली नाही. ही योजना पुर्ववत करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी डॉ. संतोष मुंडे यांनी केली आहे.

नैसर्गिक आपत्ती, आजारपण, अपघात आदी कारणामुळे पशुधन (जनावरे) दगावल्यास शेतकरी किंवा पशुपालक यांचे आर्थिक नुकसान होते.अनेकदा रोंगाच्या प्रादुर्भावामुळे किंवा नैसर्गिक संकटामुळे पशुधनाचा (जनावरांचा ) मृत्यू होतो. यामुळे पशुपालक शेतकरी यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. विमा संरक्षण असल्यास पशुपालक शेतकरी बांधवांना विम्याच्या माध्यमातून भरपाई मिळू शकते. वास्तविक पाहता शासनाने केलेली योजना 2017 पशुधश विमा योजना बंद पडलेली आहे. पशुपालकांवर अनेक संकट उभे राहतात. जर ही योजना पुर्ववत केली तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.

राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत महाराष्ट्र पशुधन विकास मंडळामार्फत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सुरुवात केली होती. ही योजना बंद पडलेल्यामुळे पशुपालकांत नाराजी व्यक्त केली जात आहे. तरी राज्य शासनाने यावर उपाय म्हणून जिल्ह्यातील लहान-मोठी जनावरे, शेळ्या, मेंढ्या आदी पशुधनाचा (जनावरांचा) पशुधन विमा उतरवून ही जनावरे संरक्षित करण्याची मोहीम हाती घेण्यात यावी. अन्यथा राज्याच्या विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी यांनी दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या