जस्टीन लँगर बनला ऑस्ट्रेलियाचा मुख्य प्रशिक्षक

14

सामना ऑनलाईन । मेलबर्न

बॉल टॅम्परींग प्रकरणानंतर डॅरेन लेहमन यांनी ऑस्ट्रेलियन संघाच्या प्रशिक्षकपदावरून माघार घेतल्यानंतर आता या संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा माजी क्रिकेटपटू जस्टीन लँगरकडे सोपवण्यात आली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख जेम्स सदरलँड यांनी गुरुवारी याबाबतची घोषणा करण्यात आली. मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर जस्टीन लँगर म्हणाला, पुढील चार वर्षांमध्ये माझे ध्येय असेल ते ऑस्ट्रेलियाला हिंदुस्थानात कसोटी मालिका जिंकून द्यायचे. हिंदुस्थानात कसोटी मालिका जिंकल्यानंतरच आम्हाला ‘ग्रेट’ संघ म्हणून ओळखले जाईल.

ऑस्ट्रेलियन संघाला आगामी काळात महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये सहभागी व्हायचे आहे. यामध्ये वन डे वर्ल्ड कप, ट्वेण्टी-२० वर्ल्ड कप आणि दोन ऍशेस मालिकांचा समावेश आहे. त्यामुळे माझ्यासमोरही खडतर आव्हान असणार आहे, असेही तो पुढे म्हणाला.

आपली प्रतिक्रिया द्या